ठळक बातम्या

    पालघर-बोईसरमध्ये गणेशोत्सवासाठी जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी! गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

    Oplus_16908288

    पालघर-बोईसरमध्ये गणेशोत्सवासाठी जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी! गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

     

    पालघर | पालघर नागरिक अपडेट..  

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि बोईसर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर कार्यालयाकडून वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पालघर आणि बोईसर शहरात गणेशमूर्ती आगमन व विसर्जनाच्या काही महत्त्वाच्या दिवशी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

     

    तारीखवार वाहतूक नियंत्रण

    🔴 14 सप्टेंबर 2026 गणेशमूर्ती आगमन व स्थापना

    🔴 15 सप्टेंबर 2026 दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

    🔴 18 सप्टेंबर 2026 पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

    🔴 20 सप्टेंबर 2026 सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

    🔴 25 सप्टेंबर 2026 अनंत 

    चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन

    वरील सर्व तारखांना जड-अवजड वाहनांना पालघर व बोईसर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.

     

    🚛 बोईसर शहरासाठी जड वाहनांचे मार्ग

    तारापूर बाजूकडून येणारी जड-अवजड वाहने :बस डेपो. बोईसर रेल्वे स्टेशन.नवापूर नाक्याकडे येणारी वाहने नियंत्रित करण्यात येणार आहेत.

    पालघर बाजूकडून येणारी वाहने :

    नवापूर रोडमार्गे बोईसर रेल्वे स्टेशन परिसराकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांनाही प्रवेशबंदी राहणार आहे.

    🚛पालघर शहरासाठी

    मनोर बाजूकडून पालघर शहरात येणारी तसेच बोईसर बाजूकडून पालघर शहरात येणारी जड-अवजड वाहने संबंधित दिवशी शहरात प्रवेश करू शकणार नाहीत.

     

    🚗 लहान वाहनांसाठी पर्यायी मार्ग

    बोईसर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लहान वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

    तारापूरकडून येणारी वाहने:

    बस डेपो. बोईसर रेल्वे स्टेशन. नवापूर नाका.मुंधवण नाका. मधुर हॉटेलसमोरून सिडको बायपास औद्योगिक मार्गे तारापूर रोडकडे.पालघरकडून येणारी वाहने:पश्चिमेकडील सिटी मार्गे मधुर हॉटेलसमोरून सिडको बायपास व औद्योगिक मार्गाचा वापर करता येणार आहे.

     

    🚗 पालघर शहरासाठी पर्यायी मार्ग.

    पालघर-बोईसर बाजूकडून पालघर शहरात येणाऱ्या लहान वाहनांसाठी चाररस्ता सेंट जोन्स. कॉलेज.नवली. ओंकार ब्रिज. आयर्न हायस्कूल मार्गे पालघर शहरात येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

     

    ⚠️ अत्यावश्यक वाहनांना सवलत

    ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने तसेच संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी असलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे?

     पालघर नागरिक अपडेट

    पालघर | बोईसर | जनतेपर्यंत अधिकृत माहिती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *