ठळक बातम्या

    भाजपा नेते संतोष जनाठे यांच्या संपर्क कार्यालयाचे मस्तान नाका मनोर येथे शुभारंभ

    भाजपा नेते संतोष जनाठे यांच्या संपर्क कार्यालयाचे मस्तान नाका मनोर येथे शुभारंभ

    आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी पालघर तालुक्यातील मस्तान नाका मनोर येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री. संतोष जनाठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.भारतीय जनता पार्टीचे श्रद्धास्थान आणि एकात्म मानववादाचे प्रणेते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून झालेला हा शुभारंभ केवळ एका कार्यालयाचा प्रारंभ नसून, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा, जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा नवा संकल्प आहे.

    या प्रसंगी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. हरिश्चंद्र भोये, भाजपा प्रदेश विभागीय प्रसिद्धीप्रमुख श्री. समीरजी पाटील, भाजपा किसान मोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर पाटील, पालघर पूर्व मंडल अध्यक्ष श्री. हर्षद पाटील, भारत भक्ती आश्रमाचे संत श्री. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, भाजपा पालघर जिल्ह्याचे माजी सरचिटणीस श्री. कमलेशजी मराठे, भाजपा पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुमती जैन, भाजपा पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्री. राजू पाटील, पालघरचे माजी नगरसेवक श्री. प्रथमेश पिंपळे, श्री. कुणाल संखे, श्री. अमितजी संखे, श्री. विनीत मोरे, श्री. शिरीष संखे, मनोर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. मंगेश गोंड यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या ‘अंत्योदय’च्या विचारांना कृतीची जोड देत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि सेवेचा लाभ पोहोचवण्याचा निर्धार या निमित्ताने करण्यात आला.

    जनतेचा विश्वास हीच खरी ताकद आणि जनतेची सेवा हीच खरी जबाबदारी!

    हा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ म्हणजे जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव खुले असलेले एक विश्वासाचे दालन आहे.

    सेवा • संघटन • जनसंपर्क • जनहित

    #संतोषजनाठे #भाजपा #पालघर #मनोर #जनसंपर्ककार्यालय #पंडितदीनदयाळउपाध्याय #अंत्योदय #सेवा #संघटन #जनहित

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *