ठळक बातम्या

    पालघरमध्ये खड्डा वाचवताना दुर्दैवी अपघात; कंटेनरच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

    पालघरमध्ये खड्डा वाचवताना दुर्दैवी अपघात; कंटेनरच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

    पालघर | 

    पालघर शहरातील रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खड्डा वाचवण्यासाठी वाहन वळवताना झालेल्या अपघातात कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्ती पालघर तालुक्यातील टेंभुर्डा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

    उपलब्ध माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव बृजमोहन भोलाराम निर्मल असे असून, घटनास्थळी कंटेनरच्या धडकेनंतर ते गंभीर अवस्थेत आढळून आले.घटनास्थळी दिसणारा रस्त्यावरील मोठा खड्डा हा या घटनेतील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. खड्डा चुकवताना वाहनांचे संतुलन बिघडणे आणि त्यातून अपघात होणे, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.पालघर चार रस्ता परिसरात यासोबतच बेशिस्त व अवैध पार्किंग, ओव्हरसिट रिक्षा व डमडम, ओव्हरलोड टेम्पो आणि ट्रकची वाहतूक यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

    या परिस्थितीकडे पालघर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अवैध पार्किंग हटवावे आणि ओव्हरसिट व ओव्हरलोड वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.एक खड्डा कुणाच्या तरी जीवावर बेतू नये, यासाठी प्रशासनाने आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. वारंवार अपघात घडूनही रस्त्यांची स्थिती आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी कायम राहिल्यास पुढील दुर्घटना टाळणे कठीण होऊ शकते.

    जावेद मजीद लुलानिया

    संपादक – पालघर नागरिक

    📞 मो. 8806247860

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *