ठळक बातम्या

    शेतकऱ्यांसाठी बँक प्रस्ताव व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

    शेतकऱ्यांसाठी बँक प्रस्ताव व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

    पालघर : कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिवीर गटाच्या विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा, वागुळसर येथे शेतकऱ्यांसाठी “बँक प्रस्ताव तयार करणे व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले.या प्रात्यक्षिकाचा उद्देश शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी बँक प्रस्ताव तयार करण्याची व सादर करण्याची प्रक्रिया तसेच शेतीसाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांची माहिती देणे हा होता. यावेळी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कृषी कर्जाचे प्रकार, पात्रता निकष, प्रकल्पाची निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्प खर्च, अपेक्षित उत्पन्न, परतफेडीची क्षमता आणि शेतकऱ्याचा स्वतःचा सहभाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    तसेच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्लास्टिक मल्चिंग व एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) यांसारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी RDCC बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. मिलिंद पंडित उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळविण्याची प्रक्रिया, बँक प्रस्ताव तयार करताना आवश्यक बाबी आणि आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना बँक कर्ज व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि व्यावहारिक ज्ञान मिळाले. तसेच विद्यार्थ्यांना कृषी वित्त, बँकिंग प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना आर्थिक व योजनांबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *