ठळक बातम्या

    भात पिकातील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी YSB ट्रॅपचे प्रात्यक्षिक

    भात पिकातील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी YSB ट्रॅपचे प्रात्यक्षिक

    माहिम (वडराई), ता. पालघर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी वीर’ गटाच्या वतीने माहिम (वडराई) येथे पिवळ्या खोडकिडीच्या (Yellow Stem Borer) नियंत्रणासाठी YSB ट्रॅपच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांना पिवळ्या खोडकिडीची ओळख, प्रादुर्भावाचे निरीक्षण तसेच YSB ट्रॅपची कार्यपद्धती व शेतात बसविण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री. नरेश पांडुरंग मोरे यांच्या शेतात दोन YSB ट्रॅप बसविण्यात आले, तसेच उपस्थित शेतकऱ्यांना चार ट्रॅप वितरित करण्यात आले.पिवळ्या खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी बाधित फुटवे काढून नष्ट करणे, निरोगी रोपांचा वापर तसेच YSB फेरोमोन ट्रॅपद्वारे नियमित निरीक्षण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यकतेनुसार जैविक नियंत्रणासाठी Trichogramma तसेच शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात आली.

    YSB ट्रॅपमुळे किडीच्या पतंगांचे निरीक्षण करून प्रादुर्भावाची वेळेवर माहिती मिळण्यास मदत होते. ही पद्धत सोपी, पर्यावरणपूरक असून अनावश्यक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास उपयुक्त ठरते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून YSB ट्रॅपच्या वापराबाबत उत्सुकता दर्शविली. ट्रॅपच्या माध्यमातून किडीचे नियमित निरीक्षण करून वेळेवर नियंत्रण उपाययोजना करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.कृषी वीर गटातील विद्यार्थी: संकेत देसाई, नंदन चौधरी, करण करांगे, चेतन करांगे, सूरज आडे, मनीष वालणकर, हर्ष महाडिक, आदित्य दळवी, जिवेश देशमुख, बजरंग गीते व बलराज जाधव.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *