ठळक बातम्या

    पालघर: मासवन आश्रमशाळेतील ५०० विद्यार्थ्यांसाठी रोटरी व इनरव्हील क्लबतर्फे स्नेहभोजन; मुंबईतील मुस्लिम मित्रपरिवार व MUDRA Group ने दिला एकतेचा संदेश.

    पालघर: मासवन आश्रमशाळेतील ५०० विद्यार्थ्यांसाठी रोटरी व इनरव्हील क्लबतर्फे स्नेहभोजन; मुंबईतील मुस्लिम मित्रपरिवार व MUDRA Group ने दिला एकतेचा संदेश.

    पालघर |

    Rotary Club of Palghar आणि Inner Wheel Club of Palghar यांच्या संयुक्त पुढाकाराने मासवन आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या सुमारे ५०० विद्यार्थी व २० शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. रो. रफिक लुलानिया व शमीम लुलानिया, त्यांचा मित्रपरिवार, अब्बास भाई, इस्माईल भाई, खतीजा, सकीना, गुलरेज, मेमुना आणि ८५ वर्षीय मोहतारम आंटी, तसेच MUDRA Group यांनी या उपक्रमासाठी विशेष सहभाग घेतला. मुंबईहून सर्वजण आवर्जून मासवन येथे आले आणि विद्यार्थ्यांसाठी चिकन स्टार्टर, व्हेज मंचुरियन, व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी, स्वीट डिश, चॉकलेट व ज्यूस यांची व्यवस्था केली.

    मुंबईतील या मुस्लिम मित्रपरिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने स्वतः भोजन वाढले. धर्म, जात-पंथ आणि भौगोलिक अंतराच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने केलेली ही सेवा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. या उपक्रमातून “विविध धर्म, एक मानवता; विविधता अनेक, पण देश एक” हा एकतेचा सुंदर संदेश समाजासमोर आला. मुंबईतील मुस्लिम मित्रपरिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांसोबत ज्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने सहभाग घेतला, ते भारताच्या ‘Unity in Diversity’ या महान संस्कृतीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.

    या कार्यक्रमाला Rotary Club of Palghar चे अध्यक्ष रो. भूषण सावे, या प्रकल्पाचे चेअरमन व माजी अध्यक्ष रो. रफिक लुलानिया, माजी अध्यक्ष रो. जयेश आव्हाड, तसेच रो. सागर पाटील, रो. कल्पेश पाटील, रो. गणेश घुगे आणि Inner Wheel Club of Palghar च्या सदस्या व प्रकल्पाच्या चेअरमन शमीम लुलानिया , Adivasi Ashram Shala che pradyapak Dhodi Saheb V Purna staff ..यांची उपस्थिती होती मानवता, प्रेम, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या या सुंदर उपक्रमासाठी मुंबईतील मित्रपरिवार, MUDRA Group, Rotary Club of Palghar आणि Inner Wheel Club of Palghar यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

     

    “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच;

    हृदये जोडली की देश अधिक सुंदर होतो.” 🇮🇳

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *