ठळक बातम्या

    पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका आजही जीवघेण्याच अवस्थेत; PWD ने पाठविलेले फोटो या रस्त्याचे नाहीत?

    पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका आजही जीवघेण्याच अवस्थेत; PWD ने पाठविलेले फोटो या रस्त्याचे नाहीत?

    पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका येथील रस्त्याची परिस्थिती आजही अत्यंत धोकादायक असून, खड्ड्यांची अवस्था पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाल्याचे आज काढलेल्या दिनांक व वेळ नमूद असलेल्या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) दुरुस्ती सुरू असल्याचे सांगत काही छायाचित्रे पाठविण्यात आली होती. मात्र, चहाडे नाका येथील सद्यस्थिती पाहता ही छायाचित्रे या ठिकाणची नसावीत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आजचे दिनांक व वेळ असलेले प्रत्यक्ष फोटो वेगळीच परिस्थिती दर्शवत आहेत.

    पालघर पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की, आपल्या कार्यालयामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, चहाडे नाका परिसरात अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती झालेली दिसून येत नाही. कृपया प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून संबंधित विभागाकडून तातडीने योग्य कार्यवाही करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे.लोकांच्या जीवाशी कोणतीही तडजोड मान्य नाही. रस्ता सुरक्षित असेल तरच नागरिकांचे जीवन सुरक्षित राहील. प्रशासनाने केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात दर्जेदार दुरुस्ती करून हा मार्ग सुरक्षित करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *