ठळक बातम्या

    केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी मुंबई येथे ‘हिंदी दिवस 2026 आणि 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उदघाटन सत्र पार पडले.

    केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी मुंबई येथे ‘हिंदी दिवस 2026 आणि 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उदघाटन सत्र पार पडले.

    जगभरातील सर्व भारतीयांना हिंदी दिवसाच्या आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान करण्याचा नेहमीच आग्रह धरला. तसेच, देशाची राजभाषा ही भारतीय भाषा असावी, यासाठी मातृभाषेसोबत किमान एक तरी दुसरी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करत पंतप्रधान मोदी यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला पुढे आणले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

     

    जागतिक मंचावर पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमध्ये बोलणारे भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदीचा स्वीकार केला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगभरातील विकसित राष्ट्रे त्यांची राजभाषा बोलतात, तर विकसनशील राष्ट्रे दुसरी भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान तितकाच महत्त्वाचा असून आज जगभरामध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदीमध्ये बोलतात, त्यावेळी आपल्या राजभाषेला मिळणारा सन्मान पाहून अभिमान वाटतो. हिंदी भाषेने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये संपर्काचे माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

    त्यामुळे मराठी आपली आई आहे, तर दुसऱ्या भाषा मावशी आहेत आणि त्या सर्व भाषांचा आपण सन्मान करतो. आज राजभाषा दिवसाच्या निमित्ताने मातृभाषेसोबतच राजभाषा आणि इतर राज्यांच्या भाषांचाही सन्मान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार, खासदार नरेश म्हस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *