ठळक बातम्या

    पालघर : गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६

    पालघर : गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६

    गणेशभक्तांना शासकीय योजनांची माहिती दिली

    पालघर,

    दि. १६ सप्टेंबर २०२६ : दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना पालघर शहरातील गणेशकुंड येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडत असतानाच, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी साधत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.जिल्हा माहिती कार्यालय, पालघर यांच्या वतीने गणेशभक्त व नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासनाचे उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने प्रत्यक्ष संवादातून जनजागृती करण्यात आली.

    यावेळी योजनेचा अर्ज किंवा फॉर्म कुठे व कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होते आणि निवड झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला कोणते लाभ मिळतात, याबाबत नागरिकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.शासकीय योजनांची माहिती केवळ प्रसिद्धी माध्यमांपुरती मर्यादित न ठेवता ती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद २०२६’चा प्रमुख उद्देश आहे. गणेश विसर्जनासाठी एकत्र आलेल्या भाविकांशी संवाद साधत ‘योजना जाणून घ्या, पात्र असाल तर लाभ घ्या’ असा संदेश यावेळी देण्यात आला.गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संगम साधत ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *