ठळक बातम्या

    जव्हार कुटीर रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; एका बेडवर दोन-तीन रुग्ण, रक्त. तपासणीसाठीही रुग्णांना त्रास.

    जव्हार कुटीर रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; एका बेडवर दोन-तीन रुग्ण, रक्त. तपासणीसाठीही रुग्णांना त्रास.

    जव्हार | १ ऑक्टोबर २०२६

     

    जव्हार येथील कुटीर रुग्णालयात रुग्णांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध छायाचित्रात एका बेडवर दोन ते तीन रुग्णांना ठेवण्यात आल्याचे दिसत असून, रुग्णालयातील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.यासोबतच रुग्णांच्या रक्त तपासणीच्या प्रक्रियेतही गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे. रक्त तपासणीसाठी रुग्णांना अनावश्यकपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू नये. प्रयोगशाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार रुग्णांकडे जाऊन रक्ताचे नमुने घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

    प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात यावी. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या तपासण्यांना विलंब होऊ नये आणि रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.एका बेडवर दोन-तीन रुग्ण ठेवण्याची परिस्थिती आणि रक्त तपासणीसाठी होणारी गैरसोय यामुळे रुग्णांच्या सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयातील बेड, मनुष्यबळ तसेच तपासणीची व्यवस्था यांचा आढावा घेऊन रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

     गणेश कलीगडा

    सहसंपादक, AP NEWS

    जव्हार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *