नूतन शाळा इमारत भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
स्वप्न साकार झाले…नवे संकुल, नव्या आशा!
सफाळे, २४ ऑक्टोबर २०२६
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आता जागतिक दर्जाचे शिक्षण! ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी या नामांकित शाळेच्या नवीन आणि अत्याधुनिक सोयी- सुविधांनी युक्त अशा नवीन शाळा इमारतीचे उद्घाटन आज अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ही इमारत सज्ज झाली असून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. ह्या शाळेचे वैशिष्टय़े म्हणजे विविध आधुनिक सुविधा उपलब्ध, विशाल व हवेशीर वर्गाखोल्या , डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, रोबोटिक्स लॅब, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी किड्स पार्क इत्यादी सुविधा उपलब्ध. उद्घाटनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्टचे लायन नटवर बंका , आपल्या भाषणात म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. सन्माननीय अतिथी, लायन कान्हयालाल बैद, लायन विकास क सराफ, लायन सुनील लावटी, लायन डॉ. के. मुदस्सीर, लायन के. एल. परमार, लायन जतीन कदम ,श्रीमती भावना नेताजी पाटील, श्री राजाराम म्हात्रे, श्री जगन्नाथ वर्तक ह्यासारखे प्रतिष्ठित व्यक्ति उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रुपाली भोईर ह्यानी केले. ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळाचे उपाध्यक्ष व माझे विद्यार्थी आणि ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट इंग्लिश मीडियम शालेय समितीचे अध्यक्ष . महेंद्र पांडुरंग कीणी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेकडून आणि संस्थेकडून सत्कार करण्यात आला.

शाळा इमारतीच्या उभारणीसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी समाजसेवकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी मोलाची आर्थिक देणगी देऊन शैक्षणिक कार्यात सहकार्य केले आहे त्यामध्ये लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्टने १८ लाख रुपये, श्री जगन्नाथ वर्तक ह्यानी १ लाख रुपये सायन्स लॅब साठी, श्री पांडुरंग किणी ह्यांनी आपल्या आई कै. गारुबाई देवजी किणी ह्यांच्या स्मरणार्थ १ लाख रुपये आणि श्री.वैभव नेताजी पाटील ह्यानी कै. नेताजी पाटील ह्यांच्या स्मरणार्थ किड्स पार्क साठी ७५ हजार रुपये आणि इतर देणगीदारांनी ह्यात हातभार लावला. शाळेतील शिक्षकांनी एकूण 36501 रुपये देणगी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चिंतामण ठाकूर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या आजवरच्या प्रगतीचा प्रवासा मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी पाटील आणि मेघना भोईर ह्यांनी केले. श्री पी. टी. पाटील ह्यानी शाळेला या नवीन वाटेवर सहकार्य करणार्या सर्व लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्टचे, देणगीदारांचे, शिक्षकांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.



