🚨 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.
02.01.2026.
मनोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बेकाबू/ चार गंभीर तक्रारींकडेही दुर्लक्ष.[(08.12.2025)]
पालघर :
मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, काला गूड, नवसागर आणि गावठी दारू यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे आरोप समोर येत आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या प्रकरणी पालघर नागरिक (PN24) चे मुख्य संपादक जावेद लुलानिया यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड मॅडम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, पालकमंत्री गणेश नाईक, तसेच पालघरचे खासदार व आमदार यांना ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे सविस्तर तक्रार पाठवली आहे.

तक्रारीत अवैध धंद्यांसोबतच चार वेगवेगळ्या गंभीर तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामध्ये
1️⃣ मनोर पोलिस ठाण्याशी संबंधित कागदपत्रे गायब होण्याचा प्रकार,
2️⃣ वाडा पोलीस ठाणे तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकावर पोलिस ठाण्याच्या आवारातच झालेली मारहाण,
3️⃣ पालघर पोलीस ठाणे विद्यार्थ्यावर झालेला गंभीर हल्ला, शेख पोलीस ने केले दुर्लक्ष..
4️⃣ सातपाटी पोलीस ठाणे महिला ना वारमवार बोलवून तक्रारींवर वेळेत दखल न घेतल्याचा मुद्दा.
यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या सर्व तक्रारी कायदा-सुव्यवस्थेशी थेट संबंधित असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढत असून सामान्य नागरिक असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पालघर नागरिक प्रशासनाकडे मागणी करत आहे की,
👉 मनोर परिसरातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी,
👉 वरील चारही तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी,
👉 आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत…
महाराष्ट्राच्या निर्भीड, वास्तव, सडेतोड बातम्या फक्त आपल्या पालघर नागरिक पोर्टल वर मुख्य संपादक:- ✒जावेद लुलानिया
पालघर नागरिक ला आवश्यक भेट द्या आणि राह अपडेट
जाहिराती साठी संपर्क करा.
Editor- Javed Lulania
Contact Number- 88062 47860



