कुर्ला येथे सामाजिक ऐक्याचा संदेश — हाजी आराफत साहेबांच्या निवासस्थानी मान्यवरांची भेट
दिनांक: 22 फेब्रुवारी 2026 मुंबई
मुंबईतील कुर्ला येथील सूफी सलामती महल येथे
हाजी आराफत साहेब
(अध्यक्ष – बीजेपी प्रणित नवभारतीय शिव वाहतूक सेना)
यांच्या निवासस्थानी अयोध्या येथील
तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगदगुरु परमहंस आचार्य महाराज जी (अयोध्या)
यांनी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि परस्पर सन्मान या विषयांवर सकारात्मक संवाद झाला. विविध धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येऊन समाजात ऐक्याचा संदेश देत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.

विशेष म्हणजे, हाजी आराफत साहेब हे यापूर्वीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर चर्चा करताना दिसले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची राज्य पातळीवरही नोंद घेतली जात असल्याचे बोलले जाते.
या कार्यक्रमावेळी भा. ज. पा. प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया उपस्थित होती त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाराजांनी हाजी आराफत साहेब व जावेद मजीद लुलानिया यांना आशीर्वाद दिला. हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


दरम्यान, रमजान निमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमही हाजी आराफत साहेब यांच्या निवासस्थानी पार पडला. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला.


✍️ विशेष प्रतिनिधी
मुंबई..
महाराष्ट्राच्या निर्भीड, वास्तव, सडेतोड बातम्या फक्त आपल्या पालघर नागरिक पोर्टल वर मुख्य संपादक:- ✒जावेद लुलानिया
पालघर नागरिक ला आवश्यक भेट द्या आणि राह अपडेट
जाहिराती साठी संपर्क करा.
Editor- Javed Lulania
Contact Number- 88062 47860



