हाजी अरफात शेख यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीसाठी 6 महिन्यांची मुदत.

हाजी अरफात शेख यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीसाठी 6 महिन्यांची मुदत.

मुंबई | 27 एप्रिल 2026 (प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावर अखेर मोठा दिलासा मिळाला असून, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी चालकांना 6 महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय लाखो चालकांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

या निर्णयामागे नव भारतीय शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष माननीय हाजी अरफात शेख यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. त्यांनी शासनाकडे लेखी निवेदन देत चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अन्यथा त्यांच्या रोजगारावर परिणाम होईल, असा मुद्दा ठामपणे मांडला होता. त्यानंतर परिवहन विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या या निर्णयामुळे चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ मिळणार असून, कोणत्याही प्रकारचा सामाजिक तणाव टाळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून चालकांना प्रभावी संवाद साधता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *