सूरसंगम रोटरी काराओके गायन स्पर्धेला पालघरमध्ये उदंड प्रतिसाद; चार गटांतील विजेत्यांचा गौरव
सर्वच गटांतील स्पर्धकांनी जुन्या-नव्या गाण्यांचे एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.तज्ज्ञ परीक्षकांचे परीक्षण व निकाल:- या स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर भावेश पाटील आणि प्राजक्ता नामजोशी यांनी काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या सूर, ताल, लय आणि सादरीकरणाचे अचूक मूल्यमापन करून खालीलप्रमाणे विजेते घोषित केले:

ग्रुप ‘अ’ (पुरुष – वय १८ ते ३५ वर्षे):
१) रूपक आचार्य
ग्रुप ‘ब’ (पुरुष – वय ३५ वर्षांपेक्षा जास्त):
१) आशिष म्हात्रे,
२) प्रतीक प्रकाश धरात, ३) अक्षय विष्णू शंखे
ग्रुप ‘क’ (महिला – वय १८ ते ३५ वर्षे):
१) सानिका नितीन धरात,
२) श्रेया तानाजी धनु
ग्रुप ‘ड’ (महिला – वय ३५ वर्षांपेक्षा जास्त):
१) सुवर्णा उमेश धरात, २) रंजना साधुराव सावळे,
३) माधुरी पाटील
रोटरी सदस्यांची उपस्थिती व प्रोत्साहन:- या दिमाखदार सोहळ्याला रोटरी क्लबच्या प्रमुख सदस्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये स्मितेज पुरव, निनाल शहा, मिलिंद उलकंदे, नितीन उल्कंदे, शैला महाजन, निशांत दीक्षित, भूषण सावे, अमित अ पाटील, कुंदन म्हात्रे,नयना पामाळे, रफिक धडा आणि संजय जिरापुरे यांनी उपस्थित राहून गायकांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवला.

यशस्वी नियोजन:- रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन, सचिव मनिष पिंपळे, डायरेक्टर (नॉन मेडिकल) अमर बाजपाई व नारायण गिरासे, प्रोजेक्ट चेअरमन जगदिश भारद्वाज आणि प्रोजेक्ट को-चेअरमन सुरेश केवट यांनी अथक परिश्रम घेऊन या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आणि शिस्तबद्ध संयोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले



