पालघरमध्ये प्रथमच ‘मॉडेल इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम (MIPS)’ चे भव्य व यशस्वी आयोजन
23 June 2026 At Sonopant Dandekar College..
पालघर : रोटरी क्लब ऑफ पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळ (एसडीएसएम कॉलेज), रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४१, रोटरी क्लब वेस्टर्न एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने पालघरमध्ये प्रथमच ‘मॉडेल इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम (MIPS)’ या अभिनव उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.

एसडीएसएम कॉलेज, पालघर येथे आयोजित या कार्यक्रमाला मा. खासदार डॉ. हेमंत सावराजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, नगराध्यक्ष उत्तम घरत, हाजी साजिद शेख (अध्यक्ष, पालघर फलाही तंझीम) हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमास ७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर, परीक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मॉक संसद अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांतील ४० विद्यार्थ्यांनी संसद सदस्यांच्या भूमिका साकारत विविध राष्ट्रीय विषयांवर प्रभावी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व, नेतृत्व, संशोधन कौशल्य आणि लोकशाही मूल्यांचे प्रभावी दर्शन घडविले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकांनी जवळपास तीन महिने परिश्रम घेतले. प्रशिक्षक विवेक वरभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तयारी केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसडीएसएम कॉलेजचे प्राचार्य प्रा. किरण सावे, उपप्राचार्य महेश देशमुख, पोल सर, मधुरा राऊत मॅडम तसेच सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. संजय महाजन, अध्यक्ष-निर्वाचित भूषण सावे, सचिव रोटेरियन मनीष पिंपळे, MIPS चेअरमन पीपी रफिक लुलानिया, इनरव्हील क्लब अध्यक्षा विनीता पाटील, MIPS सह-अध्यक्ष शमीम लुलानिया, असिफून धनानी, डिस्ट्रिक्ट अव्हेन्यू हेड अश्मी पारेख, DRR यशोवर्धन, सह-अध्यक्ष अमित राजपुरोहित, सह- अध्यक्ष हितेश जैन, पीएन रफिक धडा, गणेश घुगे सर, शैला महाजन, कल्पेश पाटील (आप्पा) तसेच रोटरी व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
तसेच PDG राहुल तिंबाडिया, रोटरी क्लब वेस्टर्न एलिट, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४१ आणि सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे विशेष योगदान लाभले.या कार्यक्रमाचे चेअरमन पीपी रफिक लुलानिया होते. पालघरमध्ये प्रथमच ‘मॉडेल इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम (MIPS)’ हा उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी केला होता. युवकांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण आणि संसदीय कार्यपद्धतीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा अभिनव उपक्रम पालघरमध्ये आणला. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सहकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाच महाविद्यालयांतील ४० विद्यार्थ्यांचा सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पालघरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हा कार्यक्रम एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणून नोंदला गेला.
युवकांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पालघरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पर्व ठरला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



