ठळक बातम्या

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

पालघर दि २ जुलै २०२६:ज‍िल्ह्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर राज्याचे व देशाचे नावलौकीक केलेल्या क्रीडा व‍िषयक कामग‍िरीचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन म‍िळावे या हेतून राज्याने राज्यस्तरावर श‍िवछत्रपती क्रीडा पुरस्कार तर ज‍िल्हास्तरावर ज‍िल्हा क्रीडा पुरस्कार देण्यास मान्यता द‍िलेली आहे.जिल्हास्तरावर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक एक व गुणवंत क्रीडापटू एक (एक पुरुष, एक महिला व एक दिव्यांग) असे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये १०, हजार असे असणार आहे. सदर पुरस्कार अर्ज हे २०२४-२५,२०२५-२६, या वर्षासाठी द‍िले जाणार आहेत.

पुरस्कारासाठी अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकाने सतत १० वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे, व वयाची ३५ वर्षे पुर्ण केले असणे आवश्यक आहे. गुणांकरीता फक्त पालघर जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी विचारात घेतली जाईल. क्रीडा मार्गदर्शकाने गेल्या १० वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू ,तसेच कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक क्रीडा पुरस्कारासाठी अर्जास पात्र आहे.
तर खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ५ वर्षापैकी २ वर्षे पालघर जिल्ह्याकडून मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्तरांवरील वरीष्ठ/कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत क्रीडा स्पर्धांमधील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे.

तरी सदर क्रीडा पुरस्करासाठी जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी अर्ज ज‍िल्हा क्रीडा अध‍िकारी कार्यालय,रुम नं.००१,बी विंग, मुख्य प्रशासकीय इमारत,पालघर बोईसर रोड,कोळगाव पालघर येथुन प्राप्त करुन घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर येथे दिनांक २०जूलै,२०२६ पर्यंत सादर करावेत तसेच अध‍िक माहीतीसाठी गिरीश इरनक, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी-9284209637, भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी,-8369752902, अमृत घाडगे, क्रीडा अधिकारी-9870048649, मयूर खोल्लम, क्रीडा अधिकारी- 9834090061, प्रितीश पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक-8208898650 या क्रमांकावर सपर्क साधावा, असे आवाहन ज‍िल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *