ठळक बातम्या

पालघर इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या नव्या वर्षाची उत्साहात सुरुवात – अध्यक्षा अॅड. अनुश्री आव्हाड यांचा समाजसेवेचा संकल्प.

पालघर इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या नव्या वर्षाची उत्साहात सुरुवात – अध्यक्षा अॅड. अनुश्री आव्हाड यांचा समाजसेवेचा संकल्प.

पालघर (पूर्व) येथील दादोबा ठाकूर हॉलमध्ये इनर व्हील क्लब ऑफ पालघरचा ३१ वा भव्य पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी सन २०२६-२७ साठी अध्यक्षा म्हणून ॲड. अनुश्री जयेश आव्हाड, सचिव मृदुला सावे, उपाध्यक्षा शमीम मर्चंट, आयपीपी ॲड. विनिता पाटील, खजिनदार चिस्तियाना धनानी, आयएसओ अमिता पाटील, सीसी मनीषा करंजीकर, तसेच नव्या कार्यकारिणीने पदभार स्विकारला. यावेळी पर्ल प्रेसिडेंट ॲड. विनिता दिपेश पाटील यांनी नेतृत्वाची धुरा नव्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली.

ॲड. विनिता दिपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील ३० वे वर्ष समाजसेवा, समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीने उजळून निघाले. त्यांच्या कार्यकाळात क्लब ने ₹५० लाखांहून अधिक मूल्याचे विविध समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. या भरीव कार्याची दखल घेत क्लब तसेच डिस्ट्रिक्ट ३१४ यांनी संपूर्ण पर्ल टीमचा विशेष गौरव केला.

या सोहळ्याला पास्ट असोसिएशन प्रेसिडेंट पुष्पा सूर्यमुर्ती प्रमुख पाहुण्या तर रोटरी प्रेसिडेंट भूषण सावे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. इन्स्टॉलेशन चेअरमन पीपी स्वाती आणि सोनाली यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. यावेळी क्लबच्या ३० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आणि सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

“सेवेतून समाजपरिवर्तन” हा ध्यास कायम ठेवत नव्या कार्यकारिणीने अधिक व्यापक आणि प्रभावी समाजसेवेचा संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षाची उज्ज्वल कामगिरी हीच पुढील वाटचालीची प्रेरणा ठरणार असून, इनर व्हील क्लब ऑफ पालघर समाजसेवेची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *