ठळक बातम्या

मनोर–पालघर वाघोबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत; रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यात यश

मनोर–पालघर वाघोबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत; रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यात यश

पालघर | दि. ४ जुलै २०२६

मनोर–पालघर वाघोबा घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर कोसळलेले मोठे झाड संबंधित यंत्रणांनी तातडीने हटविल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

सततच्या पावसामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पालघर वाहतूक पोलीस विभाग, संबंधित प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून झाड बाजूला केले, त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.प्रशासनाने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, घाट परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, सुरक्षित अंतर राखावे आणि आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा.

 

 पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *