महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; हाजी अराफात यांच्या पाठपुराव्याला यश..

     महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; हाजी अराफात यांच्या पाठपुराव्याला यश..

    पालघर नागरिक | 28.08.2026.

    विशेष वृत्त
    महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा मुद्दा हाजी अराफात साहेबांनी चालक-मालकांच्या वतीने ठामपणे मांडला. या प्रश्नावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन चालक-मालकांच्या अडचणी आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सरकारसमोर मांडला.

    “मराठी शिकण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा,” अशी चालक-मालकांची भूमिका हाजी अराफात साहेबांनी सरकारसमोर मांडली.चालकांचे वय, शिक्षणाची पार्श्वभूमी तसेच रोजच्या रोजगाराचा विचार करून त्यांना अचानक अडचणीत आणू नये, यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पुढे नेला.या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय घेतला.

    या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालक आणि मालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक चालक-मालकांनी हाजी अराफात साहेबांचे आभार मानले आहेत.

    हाजी अराफात यांचे वाहतूक क्षेत्रातील सातत्यपूर्ण काम
    हाजी अराफात साहेब गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा, टॅक्सी, टेम्पो तसेच इतर वाहतूक क्षेत्रातील चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत.सध्या ते नवभारतीय शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष असून महाराष्ट्रातील विविध वाहतूक संघटनांच्या माध्यमातून चालक-मालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आरटीओशी संबंधित प्रश्न असोत, चालक-मालकांच्या अडचणी असोत किंवा गरजू चालकांना मदतीची गरज असो—हाजी अराफात साहेब सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चालक-मालकांचे म्हणणे आहे.गरजू चालकांना कपडे वाटप करणे, त्यांच्या अडचणींमध्ये मदत करणे आणि प्रशासनाकडे प्रश्न मांडणे अशा विविध माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.

    पालघर जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांच्याकडून शुभेच्छा
    नवभारतीय शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी हाजी अराफात साहेबांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

    जावेद लुलानिया म्हणाले की,
    “हाजी अराफात साहेब, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या हाताला आधार देण्यासाठी आपण रात्रंदिवस काम करता. त्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासन आणि आरटीओ कार्यालयात पाठपुरावा करता. गरजू चालकांना मदत करता, कपडे वाटप करता आणि त्यांच्या सुख-दुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे चालक-मालकांचा महत्त्वाचा प्रश्न मांडून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळवून देण्यात आपण घेतलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे.”
    “चालक-मालकांच्या हितासाठी आपण करत असलेल्या या कार्याला मनापासून सलाम आणि पुढील सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”
    रिक्षा-टॅक्सी चालक हे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान राखतानाच चालकांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या अडचणींचाही विचार होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे दोन्ही बाबींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याची भावना चालक-मालकांकडून व्यक्त होत आहे.हाजी अराफात साहेबांच्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश चालक-मालकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

    पालघर नागरिक
    जनहितासाठी… निर्भीड पत्रकारिता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *