सुन्नी जामा मस्जिद पालघरच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार 🙏
आज पालघर येथे ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ च्या जुलूसादरम्यान पालघर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. नरळे साहेब, DYSP श्री. गवळी साहेब, PI श्री. मानभाव साहेब, API श्री. व्हटकर साहेब, PSI श्री. पवार साहेब आणि PSI श्री. केसरकर साहेब, तसेच संपूर्ण पोलीस व वाहतूक विभागाच्या पथकाने अत्यंत जबाबदारीने बंदोबस्ताची धुरा सांभाळली.विशेष म्हणजे पोलीस अधिकारी स्वतः जुलूसामध्ये उपस्थित राहून शेवटपर्यंत संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी केलेले नियोजन, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी घेतलेली काळजी आणि जुलूस शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी केलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

पोलीस प्रशासनाने ज्या आदर, सन्मान आणि आपुलकीने मुस्लिम समाजासोबत समन्वय साधला, त्यामुळे
ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसाची शोभा आणखी वाढली. हा केवळ पोलीस बंदोबस्त नव्हता, तर प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास, सहकार्य आणि भाईचाऱ्याचे सुंदर उदाहरण होते.या उत्कृष्ट सहकार्याबद्दल सुन्नी जामा मस्जिदचे चीफ ट्रस्टी हाजी रफिक लुलानिया, हाजी हनीफ लुलानिया, हाजी कादर, हाजी हनीफ धनानी. हाजी कादर धनानी हाजी भुसा भाई लुलानिया तसेच सुन्नी जामा मस्जिदचे सर्व ट्रस्टी आणि पालघरच्या अवामच्या वतीने संपूर्ण पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

तसेच मस्जिदीतूनही संपूर्ण पोलीस विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक शुक्रिया अदा करण्यात आला.
अमन, शिस्त, सहकार्य आणि भाईचारा — हीच पालघरची खरी ओळख आहे. 🤝🇮🇳
🌹 पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार!
🙏 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
दिनांक : 26 ऑगस्ट 2026
जावेद मजीद लुलानिया.



