फलाही तंजीमच्या राशन वितरणावर आणखी प्रश्नचिन्ह; लाभार्थींसह राशन वाटप करणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी.
राशन कुठून खरेदी केले? किती रुपयांचे? निधी कोणाकडून जमा झाला? तंजीममध्ये कोणाची काय जबाबदारी? पारदर्शकतेसाठी सर्व माहिती जाहीर करण्याची मागणी
पालघर | दिनांक : १ सप्टेंबर २०२६
पालघर येथे फलाही तंजीमच्या माध्यमातून गरजू व गरीब महिलांना राशनचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांना मदत करणे हे निश्चितच चांगले सामाजिक कार्य आहे. मात्र, या राशन वितरणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राशन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया, निधीचा स्रोत आणि कार्यक्रमात सहभागी असलेल्या जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.



राशन वाटपाच्या वेळी लावण्यात आलेल्या बॅनरचा आधार काय होता? हा कार्यक्रम नेमका कोणाच्या अधिकृत परवानगीने किंवा निर्णयाने आयोजित करण्यात आला? तसेच या कार्यक्रमात सहभागी असलेल्या व्यक्तींची फलाही तंजीममध्ये नेमकी कोणती जबाबदारी किंवा पद आहे, याची माहितीही स्पष्ट होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, कार्यक्रमामध्ये स्थानिक नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी/जबाबदार व्यक्ती उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसून येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती तंजीमशी कोणत्या पदावरून जोडलेल्या आहेत आणि राशन वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे कोणी सोपवली, याचीही माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

राशनसाठी पैसा कुठून आला?
या राशन वितरणासाठी किती रक्कम खर्च करण्यात आली? राशन कोणत्या दुकानातून किंवा पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले? बिल किती रुपयांचे आहे? पैसे कोणत्या निधीतून देण्यात आले? याचा तपशील उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच या कार्यक्रमासाठी संबंधित व्यक्तींनी किंवा तंजीमच्या माध्यमातून किती नागरिकांकडून देणगी, चंदा, जकात किंवा इतर स्वरूपात निधी जमा केला, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली आहे.
लाभार्थी महिलांची माहिती का घेतली जात होती?
राशन घेण्यासाठी आलेल्या महिलांची नावे नोंदवून घेतली जात असल्याचेही या कार्यक्रमाच्या दृश्यांमधून दिसून येते.
त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की ही नावे कोणत्या कारणासाठी घेतली जात होती?
लाभार्थींची पात्रता तपासण्यासाठी काही प्रक्रिया होती का?
ही यादी कोणाकडे जमा करण्यात आली?
या यादीचा पुढे कशासाठी वापर केला जाणार आहे?
लाभार्थींच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा विचार करून या संपूर्ण प्रक्रियेची माहिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.तंजीममधील पद आणि निर्णय प्रक्रियाही स्पष्ट व्हावी राशन वाटप करणाऱ्या व्यक्तींना फलाही तंजीममध्ये काही अधिकृत पद असल्यास ते पद कोणते, त्यांना ही जबाबदारी कोणी दिली आणि तंजीमच्या कोणत्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, याची माहितीही समाजासमोर येणे आवश्यक आहे.
“गरीबांना मदत करण्यास आमचा विरोध नाही. उलट गरीबांच्या मदतीचे काम अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावे, हीच आमची भूमिका आहे. मात्र समाजाकडून निधी जमा होत असेल, तर त्या निधीचा स्रोत, राशन खरेदीची बिले, खर्चाची रक्कम, लाभार्थींची निवड आणि कार्यक्रमाची जबाबदारी कोणाकडे होती, याची माहिती अवामला मिळण्याचा अधिकार आहे,” अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
य सर्व बाबींबाबत फलाही तंजीमच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अधिकृत कागदपत्रे आणि स्पष्ट माहिती देऊन खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.गरजूंची मदत ही इबादत आहे; मात्र त्या मदतीत पारदर्शकता, सन्मान आणि हिशोबही तितकाच महत्त्वाचा आहे.या प्रकरणातील पुढील अधिकृत माहिती, कागदपत्रे आणि संबंधितांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पुढील भागात सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.



