ठळक बातम्या

    पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना: निर्जन डाक बंगल्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार; तलासरी पोलिसांकडून आरोपींना बेड्या, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी.

    पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना: निर्जन डाक बंगल्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार; तलासरी पोलिसांकडून आरोपींना बेड्या, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी.

     

    पालघर / तलासरी | 

    तलासरी परिसरातील धक्कादायक प्रकार:

    पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मित्रासोबत महामार्गावर थांबलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला दुचाकीवरून आलेल्या ६ जणांनी जबरदस्तीने एका बंद पडलेल्या निर्जन डाक बंगल्यात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी:

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसर तातडीने सील केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने व महत्त्वपूर्ण पुरावे ताब्यात घेतले असून तपास वेगाने सुरू आहे.

    पोलीस निरीक्षक अजय गोरड यांची माहिती:

    या प्रकरणाबाबत तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी माहिती दिली की, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ६ संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *