रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे शुद्ध पेयजल व वाॅटर कुलर उद्घाटन
नवरात्राच्या पावन कालखंडात रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे दोन आर ओ व वाॅटर कुलर यंत्रणा पालघर येथील विठ्ठल मंदिर आणि अंबामाता मंदिरात अर्पण करण्यात आल्या.
विठ्ठल मंदिर पालघर येथील जलशुद्धीकरण यंत्र मे.प्रिमियर इंजीनियरिंग टेक्निकचे श्री.संघवी यांनी प्रायोजित केले.
तर Dehradun मंदिरातील जलशुद्धीकरण यंत्र मे..विपुल ऑर्गेनिक यांच्या सहकार्याने अर्पण करण्यात आले.

आरोग्य, शिक्षण व पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्री वर कार्य करीत असताना भाविक व पांथस्थांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष रोटे.भूषण सावे यांनी आत्मिक समाधान प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली.कार्यक्रम प्रमुख म्हणून रोटे.निनल शहा यांनी उत्कृष्ट नियोजन केले.त्याचप्रमाणे दोन्ही मंदिराचे विश्वस्त, देणगीदार आणि रोटरी क्लब सदस्य यामध्ये उत्तम समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.
याप्रसंगी देणगीदार, विश्वस्त व रोटरी क्लब ऑफ पालघरचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.



