ठळक बातम्या

सफाळे पोलिसांची मोठी कारवाई! खुनाचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक.पालघर पोलिसांच्या तपासाला यश; न्यायालयाकडून आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी.

सफाळे पोलिसांची मोठी कारवाई! खुनाचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक.पालघर पोलिसांच्या तपासाला यश; न्यायालयाकडून आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी.

पालघर : सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पालघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सफाळे पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला.

पोलीस प्रेसनोटनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सजनी विनोद वाघरी (वय ५२) या जखमी अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

तपासात दोन आरोपी निष्पन्न

पोलीस तपासादरम्यान निलेश धर्माजी विभांडे (वय ३५) आणि उज्वला नवसू खुताडे (वय ३३), दोघेही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रहिवासी, यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्यांनी काचेच्या बाटलीने डोक्यावर वार केल्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ता शेलके यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास सफाळे पोलीस करीत आहेत.

 

पालघर नागरिक. जावेद लुलानिया.पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *