पालघर नगरपरिषद परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.
दिनांक : 19.09.2025

पालघर नगरपरिषद परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेक रस्त्यांवर गाई बसून रहदारी अडवतात. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर सांडलेले शेणामुळे नागरिक घसरून अपघातग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे.

खड्डे व ट्रॅफिक जामची समस्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. गावातील प्रतिष्ठित माजी नगरसेवक, पत्रकार बंधू आणि सर्व पालघरकरांनी ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

खास गोष्ट म्हणजे या खराब रस्त्यांचे व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत की आपल्या गावाची बदनामी सुरू झाली आहे. हे आपल्या गावासाठी लाजिरवाणे आहे.

जर पालघर नगरपरिषद आणि प्रशासन आता सुद्धा जागे झाले नाहीत, तर आम्हाला या खड्ड्यांवरच त्यांना बसवण्याची वेळ येईल… आणि त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागेल.

जय हिंद, जय महाराष्ट्र 🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *