सफाळा बाजारपेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग
पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दिनांक : 21 सप्टेंबर 2025 सफाळा बाजारपेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली असून तब्बल ६ दुकाने जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानदारांनी व्यवसायासाठी ठेवलेला माल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू व खाद्यपदार्थ क्षणार्धात जळून खाक झाले. घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे व असंतोषाचे…



