पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
दि. 28 ऑक्टोबर 2025
🟥 मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड!
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका क्लब वर अखेर पालघर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेबांनी थेट कारवाई केली आहे.
ही कारवाई म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरकायदेशीर धंद्यांविरोधात प्रशासनाकडून मिळालेला एक जोरदार संदेश आहे.
मात्र, या घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे
“जेव्हा ही तक्रार आधीच पालघर नागरिक ग्रुपकडून आणि पत्रकार जावेद लुलानिया यांनी केली होती, तेव्हा इतक्या उशिरा कारवाई का झाली?”
पूर्वीही मोखाडा पोलीस स्टेशन हद्दीत याच ठिकाणी रेड टाकून गुन्हे दाखल करण्यात आले होते, तरीदेखील काही दिवसांत पुन्हा मटका-जुगार सुरू झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
नागरिकांचा सवाल :
“एसपी साहेबांनी तर कारवाई दाखवली, पण स्थानिक पोलिसांवर काही कारवाई होणार का?”
या पार्श्वभूमीवर जावेद लुलानिया यांनी एसपी साहेबांकडे थेट प्रश्न विचारला
“आपले पोलीसच जर अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार?”
🚨 👮♂ यालाच म्हणतात खाकी वर्दीतील जिगरबाज, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक!
अवैध धंद्यांना आता लगाम लागणार असं दिसतंय!
👉 पूर्ण बातमी आणि व्हिडिओ पाहा इथे :
🎥 YouTube लिंक क्लिक करा
✍ जावेद लुलानिया
पत्रकार – पालघर नागरिक संपादक
📍 28, मुद्रा कॉम्प्लेक्स, कचोरी रोड, पालघर
📞 8806247860



