“तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

🔥 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज

🗓 दि. 28 ऑक्टोबर 2025

🟥 “तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

पालघर हादरलं तक्रारदाराला न्याय मिळणार का?
तीन महिन्यांपासून पोलीस कार्यालयांमधून फिरूनही अद्याप न्याय नाही!

पालघर :

सुन्नी जामा मस्जिद पालघर परिसरात घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबाबत पत्रकार जावेद लुलानिया यांनी पालघर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय आणि एसपी कार्यालयात वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या.
मात्र, तीन महिन्यांनंतरही त्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शेवटी हा विषय दहशत विरोधक शाखा (ATS) पालघर कडे सोपविण्यात आला, पण त्या शाखेने लेखी उत्तरात स्पष्ट नमूद केले आहे —
“हा विषय आमच्या कडे नाही.”

या उत्तरामुळे नागरिक आणि तक्रारदार दोघेही चकित झाले आहेत.
जावेद लुलानिया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला 

> “जेव्हा केवळ एक साधी एनसी (NC) घ्यायची होती, तेव्हा मला तीन महिने का फिरवले? आणि आता सर्व विभाग हात वर का करत आहेत?”

त्यांनी असा आरोप केला आहे की,
“भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी पैशांच्या जोरावर ‘सेटिंग’ केली असून, निष्पक्ष चौकशीपासून विषय वळवला गेला आहे.”

नागरिकांचा सवाल :

“जेव्हा एक पत्रकार स्वतःसाठी न्याय मिळवू शकत नाही, तेव्हा सर्वसामान्य नागरिकाचा न्याय कोण देईल?”

जावेद लुलानिया म्हणाले —

पण अन्यायाविरुद्ध बोलणे माझा धर्म आहे.”

✍ जावेद लुलानिया
पत्रकार – पालघर नागरिक संपादक
📍 28, मुद्रा कॉम्प्लेक्स, कचोरी रोड, पालघर
📞 8806247860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *