पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकच गती, एकच शक्ती – रन फॉर युनिटी’ कार्यक्रम आयोजित

रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित केले बाबत

पालघर रेल्वे पोलीस ठाणे

सरदार वल्लभभाई पटेल यांची दिनांक 31/10/2025 रोजी 150 वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त राज्यात व देशात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने लोहमार्ग मुंबई अंतर्गत.

पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे आज दिनांक 31/10/2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकच गती एकच शक्ती रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मैदानाचे बाजूला रिक्षा स्टॅन्ड जवळ पालघर पूर्व येथून शासकीय विश्रामगृह पालघर व परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मैदानाचे बाजूला रिक्षा स्टँड जवळ अशी 02 किमी अंतराची दौड घेण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये पोलीस ठाणेचे 05 पोलीस अधिकारी व 40 पोलीस अधिकारी,02 RPF अधिकारी,10 RPF पोलीस स्टाफ व 140 नागरिक असे एकूण 200 लोकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदरचा कार्यक्रम हा सकाळी 07.00 ते 07.30 वा. पर्यंत आयोजित करण्यात आलेला होता. सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.

 मा. सविनय सादर 

सचिन इंगवले 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पालघर रेल्वे पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *