राष्ट्रीय एकतेसाठी ‘रन फॉर युनिटी’ — पालघर पोलिसांचा जनतेसोबत एकात्मतेचा धावता संकल्प!

पालघर

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय एकता दिन” साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर “रन फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले — आणि जनतेचा, पोलिसांचा, विद्यार्थ्यांचा, अधिकारीवर्गाचा असा उत्साह काठोकाठ भरलेल्या एकात्मतेच्या या धावण्यात दिसून आला.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २ कि.मी. व ५ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वाडा पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या मुख्य धाव उपक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई) तसेच यतिश देशमुख (पोलीस अधीक्षक, पालघर) यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचवेळी पालघर शहरात झालेल्या धाव उपक्रमाला मनोज रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर), विनायक नरळे (अपर पोलीस अधीक्षक, पालघर) व सुहास व्हनमाने (जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर) हे मान्यवर उपस्थित होते.

या एकतेच्या धावण्यात फक्त पोलिस दल नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवला. तब्बल ८,००० नागरिकांनी पोलिसांसह धावत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. या धावपळीच्या युगात “एक भारत, श्रेष्ठ भारत” ही भावना प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा हा उपक्रम ठरला. प्रत्येक ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जनतेसोबत धाव घेत एकात्मतेचा संकल्प केला.

कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागींस राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. ‘एक देश, एक ध्येय — भारताची अखंडता’ हा संदेश देत मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्व धावपटूंना पालघर पोलीस दलाकडून प्रशस्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.

“रन फॉर युनिटी” हा फक्त एक उपक्रम नव्हता — तो एकतेचा उत्सव होता. पोलिसांच्या गणवेशातली शिस्त, नागरिकांच्या सहभागातून उमटलेली देशभक्ती, आणि लोहपुरुषांच्या प्रेरणेतून धावलेला हा दिवस पालघर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.

पालघर पोलीस दलाच्या एकजुटीने व नागरिकांच्या आत्मीय सहभागाने साकारलेली ही ‘एकतेची धाव’ — भारताच्या संघटित शक्तीचे प्रतीक ठरली!

महाराष्ट्राच्या निर्भीड, वास्तव, सडेतोड बातम्या फक्त आपल्या पालघर नागरिक पोर्टल वर मुख्य संपादक:- ✒️जावेद लुलानिया

पालघर नागरिक ला आवश्यक भेट द्या आणि राह अपडेट

जाहिराती साठी संपर्क करा. 

Editor – Javed Lulania

Contact Number – 88062 47860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *