पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज

दि. 09 नोव्हेंबर 2025

पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त!

पालघर, जव्हार आणि डहाणू या तिन्ही शहरांमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत.

नेतेमंडळी, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या सभा आणि दौरे सुरू आहेत पण या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान जनतेच्या मूलभूत समस्या मात्र तशाच प्रलंबित आहेत.

रस्त्यांची दयनीय अवस्था

पालघर जिल्ह्यातील रस्ते अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.

पालघर ते डहाणू, जव्हार ते मनोरपर्यंत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत.

शहरात वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेदेखील धोकादायक झाले आहे.

🗑️ कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले

नगरपरिषद परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग दिसत आहेत.

साफसफाईचा मागमूस नाही, आरोग्य विभाग निष्क्रिय आहे.

मच्छर, दुर्गंधी आणि अस्वच्छता — हेच आज जिल्ह्याचे वास्तव झाले आहे.

अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पालघर, जव्हार आणि डहाणू परिसरात गुटखा, गांजा, गावठी दारू आणि मटका-जुगार हे धंदे खुलेआम सुरू आहेत.

नागरिक सांगतात की, “पोलिसांना सर्व माहिती असूनही कारवाई होत नाही.”यामुळे जनतेत संताप आहे.कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीरपालघर जिल्ह्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे.पण आज कलेक्टर इंदूराणी जाखड मॅडम यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा प्रशासन कोसळल्याचे स्पष्ट दिसते आहे. रस्ते असोत, कचरा असो की अवैध धंदे —सगळीकडे प्रशासनाचा शून्य कारभार!

 नागरिकांचा सवाल.

“मंत्री, खासदार आणि आमदार निवडणुकीसाठी गावोगाव फिरत आहेत,

पण रस्ते, कचरा आणि अवैध धंदे यांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही!”

“कलेक्टर मॅडम, तुम्ही हे सर्व पाहूनही मौन का बाळगले आहे?”

जावेद लुलानिया

पत्रकार – पालघर नागरिक संपादक

28, मुद्रा कॉम्प्लेक्स, कचोरी रोड, पालघर

📞 8806247860.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *