पालघर नगरपरिषदेत नवा झंकार जावेद लुलानिया यांचे ‘क्रेन’ उड्डाण!
विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात!
पालघर : राजकारणात पैसा आणि सत्तेचा खेळ चालू असताना, जनतेचा आवाज मात्र कुणी ऐकलेला नाही. पण आता त्या शांततेचा भंग होत आहे. पालघर नगरपरिषद निवडणुकीत माइनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) कडून जावेद लुलानिया हे नवा चेहरा म्हणून रिंगणात उतरले असून, त्यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकीय वातावरणात नव्या ऊर्जेची चाहूल लागली आहे.
जावेद लुलानिया हे केवळ उमेदवार नाहीत ते एक विचार आहेत. पत्रकारितेतून समाजातील अन्यायावर आवाज उठवणारे, समाजकारणातून सर्वसामान्यांसाठी उभे राहणारे आणि लोकहिताच्या लढ्यात कधीही मागे न हटणारे लुलानिया आता पालघरच्या नेतृत्वासाठी जनतेचा विश्वास मागत आहेत.
त्यांचे ध्येय स्पष्ट आणि प्रामाणिक “समान न्याय, स्वच्छ प्रशासन आणि सुरक्षित समाज.”
ते म्हणतात, “पालघरच्या भावंडांनी, बहिणींनी आणि तरुणांनी मला आपले आशीर्वाद आणि बहुमत देवून विजय मिळवून द्यावा. माझी निशाणी आहे ‘क्रेन’ — जी मेहनत, प्रगती आणि विकासाचं प्रतीक आहे.”
‘क्रेन’ हे चिन्ह जसं आकाशाकडे झेप घेणारं, तसं पालघरच्या विकासाचं प्रतीक बनू शकतं. आज नागरिकांना रस्ते हवे आहेत, नळात पाणी हवं आहे, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षेची खात्री हवी आहे आणि हे सर्व फक्त वचनांनी नव्हे, तर कृतीने शक्य आहे, असा ठाम विश्वास लुलानिया व्यक्त करतात.

MDP पक्षाचं तत्त्वज्ञान साधं पण प्रभावी —
“मेहनत, विकास आणि वचनबद्धता.”
हा पक्ष धर्म, जात, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन लोकशाहीचा खरा अर्थ जनतेच्या दारात पोचवण्याचं काम करत आहे. आजपर्यंत सत्तेत असलेल्या नेत्यांनी विकासाच्या नावावर केवळ आश्वासनं दिली, पण कृतीच्या मैदानात अपयश झेललं. त्या पार्श्वभूमीवर जावेद लुलानिया हे स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिक हेतू असलेले उमेदवार म्हणून आशेचा किरण ठरत आहेत.
लुलानिया म्हणतात “ही निवडणूक फक्त खुर्चीची नाही, तर पालघरच्या भविष्याची आहे. पारदर्शक प्रशासन, जबाबदार नेतृत्व आणि नागरिकांच्या सहभागातून आम्ही खऱ्या अर्थाने शहर उभं करू.”
पक्षाने पुढाकार घेत, जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेसाठीही प्रामाणिक, समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. ही चळवळ राजकारणासाठी नाही समाजकारणासाठी आहे.

आज ‘क्रेन’ ही निशाणी म्हणजे फक्त चिन्ह नाही ती जनतेच्या विकासाच्या आकांक्षेची उंच भरारी आहे.
पालघरचा मतदार आता फक्त आश्वासनं नको म्हणतो, त्याला बदल हवा आहे — आणि तो बदल ‘जावेद लुलानिया’ या नावाने उमटतो आहे.
निशाणी : “क्रेन”
मत म्हणजे पालघरच्या विकासाच्या दिशेने एक ठोस पाऊल!
जागा बदलू नका, विचार बदला कारण विकासासाठी आता ‘लुलानिया’च हवा



