पालघर ब्रेकिंग न्यूज मुंबई–अहमदाबाद हायवेवरील “हरित” ब्रिज!
स्थान – मस्तान नाका ब्रिज ते टेन नाका, मनोर रोड, जिला पालघर
दिनांक – 11.11.2025
अस्सलाम वालेकुम 🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र.
मुंबई–अहमदाबाद हायवेवरील मस्तान नाका ब्रिज, जो आधीच तुटण्याच्या स्थितीत आहे,त्या पुलावर आता झाडंही उगवली आहेत!
हे दृश्य पाहून असं वाटतं की “रस्ता नव्हे, जणू बाग तयार झाली आहे!
ही काही नैसर्गिक सौंदर्याची किमया नाही तर ही एनएचआय आणि कंत्राटदारांच्या बेफिकीरीची कमाल आहे.
लाखो–कोटी रुपयांचा टोल दररोज वसूल होतो,पण पुलाची देखभाल करणारे युनिट 48 चे मेंटेनन्स कर्मचारी कुठे आहेत?
लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय.
जर या झाडांच्या मुळांनी काँक्रीटच्या भेगा अजून खोल केल्या,
तर उद्या कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो.
सरकारने अशा कंत्राटदारांना सन्मानित नाही तर निलंबित करायला हवे!
हा हायवे म्हणजे प्रवाशांसाठी “मौत का कुआँ” बनत चालला आहे.
🖋️ जावेद लूलानिया
संस्थापक – NH 48 Information Group
संपादक पालघर नागरिक ग्रुप.
माजी नगरसेवक, पालघर नगरपरिषद.



