डॉ. प्रेमचंद गोड यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश — भाजपला आणि पालघर नगरपरिषदेला मोठा धक्का!

पालघर नागरिक स्पेशल रिपोर्ट

पालघर :
पालघरच्या राजकारणात आज मोठी हालचाल झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पालघर नगरपरिषद क्षेत्रात भाजपकडून उभे राहताना शिवसेनेपेक्षा तब्बल ८,००० मतांनी पुढे असलेले डॉक्टर प्रेमचंद गोड यांनी आज शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. डॉ. गोड यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात भाजपचे नाराज कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले.

भाजपमध्ये नाराजी मोठा राजकीय संकेत

पालघर शहरात नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांना संधी न दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
आता त्याच नाराजीतून डॉ. गोड यांच्या नेतृत्वाखाली मोठा वर्ग भाजपपासून दूर जात आहे, असे दिसत आहे.

नगरपरिषद निवडणुकीत मोठा प्रभाव

डॉ. गोड यांनी 2014 मध्ये पालघर शहरात मिळवलेले 8,000 मतांचे प्रचंड वैयक्तिक बळ आता शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *