पालघर शहरात चोरीची मालिका वाढली नागरिक भयभीत, पोलिसांवर प्रश्नचिन्ह
पालघर :
पालघर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून आता या घटना सामान्य बाब बनल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मनोर रोडवरील ओवेज चिकन शॉप येथे ८ डिसेंबरच्या रात्री चोरीची घटना घडली. दुकानातून इन्व्हर्टर बॅटरीची चोरी झाल्याने दुकानाचे मालक जावेद मजीद लुलानिया यांनी 112 वर कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. परंतु दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात उशीर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पालघर शहरात
✔ गांजा पिणारे,
✔ गर्दा व्यसनी,
✔ आणि चोरीचा माल घेणारे भंगार माफिया
मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.
यामुळे परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांना कोणतीही भीती उरलेली नाही.
जावेद लुलानिया यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की
“पालघरमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत आणि भंगार माफिया चोरीचा माल खुलेपणे घेत आहेत. त्यामुळे आमच्या बॅटरी चोरीच्या प्रकरणात तात्काळ चौकशी करून आरोपी शोधावेत.”
नागरिकांचा आरोप आहे की लहान-मोठ्या चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या तरीही त्यावर पुरेशी आणि जलद कारवाई होत नाही, त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत आहे.
नागरिकांची मागणी :
👉 शहरातील चोरीच्या वाढलेल्या घटनांकडे पोलिसांनी विशेष पथक नेमून लक्ष द्यावे
👉 भंगार माफिया आणि चोरीचा माल घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
👉 सीसीटीव्ही फुटेज तपासणी तातडीने पूर्ण करून आरोपी पकडावेत
पालघर नागरिक प्रशासनाला स्पष्ट संदेश देत आहे की
“पालघर शहर सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी दृश्यमान आणि कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.



