रक्षकच झाले भक्षक : कासा पोलिस ठाण्यात धक्कादायक अत्याचार प्रकरण.
डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर हवालदाराने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार प्रकामानला जात आहे.
२५ वर्षीय पीडित महिलेची तक्रार होती की तिचा पती एका महिलेसोबत घर सोडून गेला. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी हवालदार शरद भोगाडे (वय ४१) यांनी पीडितेच्या २१ वर्षीय नातेवाईक तरुणीला वारंवार पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीच्या नावाखाली भोगाडे यांनी तिच्याशी अनुचित वर्तन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले.शात आला आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलामध्ये अशा घटना घडणे, हा संपूर्ण विभागाच्या प्रतिमेवर काळा डाग
घटनेचा शिखर २९ नोव्हेंबर रोजी आला. विश्वास संपादन करून भोगाडे यांनी तरुणीला कासा पोलिस ठाण्याच्या मागील वसाहतीतील खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. धक्क्यात गेलेली तरुणी काही दिवस शांत राहिली; परंतु अखेर धीर एकवटून तिने ७ डिसेंबर रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच डहाणू पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास कासा पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानंतर आरोपी हवालदार ७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अटक करण्यात आला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. यतीश देशमुख साहेबांनी तडकाफडकी प्रशासनिक कारवाई केली. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अविनाश मांदळे यांची तातडीने बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली असून, त्यांच्या जागी निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही घटना प्रकाशात आल्यानंतर स्थानिक नागरिक संतप्त असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
“जर रक्षकच भक्षक बनत असतील, तर महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा रोष व्यक्त केला जात आहे. आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई होण्याची आणि पोलिस दलातील अशा घटनांवर अंकुश आणण्याची जोरदार मागणी होत आहे.



