पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर.

पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर.

 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्तने आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

 

आज दिनांक 05/01/2026 रोजी11.00 ते 15.20 वाजेपर्यंत पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेझिंग डे निमित्ताने श्री मंगेश उईके जन कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष तसेच त्यांचे सहगण कमिटी सहकारी आणि श्री अभिनंदन पाटील, मार्केटिंग मॅनेजर वरद मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल बोईसर, डॉ.रणजीता जैन, समता संस्कार सेवा फाउंडेशन, डॉ. अश्विनी पांडे लाईफ लाईन हॉस्पिटल, सौ. पिंकी पाटील मॅडम समता संस्कार सेवा फाउंडेशन संचालक अध्यक्षा. व त्यानंच्या सहकारी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आरोग्य शिबिरात सौ. सुवर्णा वाघमारे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष व रेल्वे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , आरपीएफ स्टाफ तसेच रेल्वे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे एकूण 70 पेक्षा अधिक लोकांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला व सदर उपक्रमाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमाकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन इंगवले स्वतः, पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल सावरकर व 30 पोलीस अंमलदार आणि 03 होमगार्ड असे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आयोजक पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगवले सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपन्न करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *