NH 48 हायवे इन्फॉर्मेशन ग्रुप.
खानिवडे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी वाढवणारे महामार्ग मदत पोलीस?
मदतीऐवजी वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप व्हिडिओ व्हायरल 🚨
दिनांक : 30 जानेवारी 2026.
पालघर जिल्ह्यातील NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडी होत आहे. मदतीसाठी असलेले महामार्ग पोलीस आणि वाहतूक यंत्रणा प्रत्यक्षात कोंडी सोडवताना दिसत नसून, फक्त वाहनचालकांकडून कागदपत्रांच्या नावाखाली वसुली करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या मार्गावर रोज ५ ते ६ तासांपर्यंत ट्रॅफिक जाम होत असून, रस्त्यावर बंद पडलेली वाहने, खड्डे, अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पोलीस व RTO विभाग केवळ कारवाईच्या नावाखाली वसुली करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात खानिवडे टोल नाक्यावरील वास्तव स्पष्टपणे दिसत आहे. महामार्ग मदत पोलीस कोंडी कमी करण्याऐवजी ती वाढवत असल्याचा सवाल या व्हिडिओमधून उपस्थित करण्यात आला आहे.
“आपला जिल्हा – आपली बातमीपत्र : जनतेचा वाली” या माध्यमातून संपादक विजय घरत यांनी या विषयावर धाडसी आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांच्या लेखणीला आणि पत्रकारितेतील प्रामाणिकतेला पालघर नागरिकचा सलाम.
🔴 सामान्य नागरिकांना आवाहन महामार्गावर होणारी बेकायदेशीर वसुली, दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार याचे व्हिडिओ व फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून प्रशासनावर कारवाईसाठी दबाव निर्माण होईल. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना गप्प बसवायचे असेल तर आवाज उठवणे गरजेचे आहे.
जावेद मजिद लुलानिया.
NH-48 इन्फॉर्मेशन ग्रुप, पालघर.
☑️भाजपा प्रणित
नव भारतीय शिव वाहतूक संघटना.
जावेद मजीद लुलनिया.
पालघर जिल्हा अध्यक्ष पालघर..



