पालघर महसूल विभाग निवड कारवाई – केळवे दादर पाड्यात गरीबाच्या घरावर बुलडोझर..?

पालघर महसूल विभाग निवड कारवाई – केळवे दादर पाड्यात गरीबाच्या घरावर बुलडोझर..?

पालघर तालुक्यातील केळवे दादर पाडा परिसरात महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित जागा ही सरकारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अस्तित्वात असल्याची चर्चा आहे. मात्र, संपूर्ण परिसरातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून केवळ एका गरीब व्यक्तीच्या घरावरच बुलडोझर चालविण्यात आल्याने निवडक कारवाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूला अनेक ठिकाणी शेड, बांधकामे आणि इतर स्वरूपाचे अतिक्रमण दिसून येते. तरीसुद्धा एका व्यक्तीवरच तातडीने कारवाई का करण्यात आली? हा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात पालघर तहसीलदार यांनी आदेश काढल्याचे समजते. मात्र, आदेश काढताना संपूर्ण परिसराचा सर्वेक्षण अहवाल, इतर अतिक्रमणधारकांवरील कारवाईची स्थिती आणि समान न्यायाची अंमलबजावणी झाली का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
सदर प्रकरणात प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेऊन सर्व अतिक्रमणांवर समान आणि न्याय्य कारवाई करावी, अन्यथा ही निवडक कारवाई असल्याचा आरोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गरीब नागरिकांवरच कठोर कारवाई आणि इतरांकडे दुर्लक्ष, असा दुहेरी निकष स्वीकारला जाऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *