ठळक बातम्या

सार्वजनिक सूचना बोईसर एमआयडीसी, तारापूर, जिल्हा पालघर येथील रहिवाशांसाठी

सार्वजनिक सूचना
बोईसर एमआयडीसी, तारापूर, जिल्हा पालघर येथील रहिवाशांसाठी

आज Bhageria Industries Limited, स्थित Boisar MIDC Tarapur, जिल्हा Palghar येथे कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाल्याची माहिती सर्व नागरिकांना देण्यात येत आहे.

सदर वायू वातावरणात पसरल्यामुळे काही ठिकाणी पांढऱ्या धुरासारखा / धुक्यासारखा दिसू शकतो.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणतीही घाईगडबड करू नये, ही विनंती आहे. कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणा व प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहेत.

परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत खालील सूचना काटेकोरपणे पाळाव्यात:

करावयाच्या गोष्टी (Do’s):
• शांत राहावे व शक्यतो घरामध्येच थांबावे.
• घरातील सर्व दरवाजे व खिडक्या बंद ठेवाव्यात.
• पंखे, एसी व इतर वायुवीजन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावीत.
• अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे.
• प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
• लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.

करू नयेत अशा गोष्टी (Don’ts):
• घाबरू नये किंवा अफवा पसरवू नयेत.
• कारखान्याजवळ किंवा गळती झालेल्या ठिकाणी गर्दी करू नये.
• गळतीच्या ठिकाणी जाण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नये.
• अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये.
• आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणू नये.

पुढील माहिती आवश्यकतेनुसार कळविण्यात येईल. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

ही सूचना जनहितार्थ जारी करण्यात येत आहे.

माधव तोटेवाड
सहसंचालक
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *