ठळक बातम्या

१४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर १६ फेब्रुवारीला संबंधित प्रकरणी लेखी निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दिनांक : 02/03/2026
पालघर | विशेष प्रतिनिधी
१४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर १६ फेब्रुवारीला संबंधित प्रकरणी लेखी निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रकरणाची संपूर्ण माहिती प्रशासनाला देण्यात आली असूनही तपास किंवा गुन्हा नोंदणीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या पार्श्वभूमीवर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी, अंजुमन सामाजिक संस्था आणि एकता सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे आमरण उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. न्याय आणि कायद्याची अंमलबजावणी व्हावी, तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हाजी जावेद मजीद लुलानिया आणि शमीम यासीन शेख उपोषणात सहभागी होणार असून, त्यांच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग राहणार आहे. वनिता संतोष बरड, कविता संख्ये, रंजना पांडे, नईमा शफिक शेख, सईदा नसीम मनोरवाला आदींचा सहभाग अपेक्षित आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित प्रशासनिक विभागांना आमरण उपोषणाबाबत अंतिम लिखित सूचना देण्यात येणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर मार्गानेच करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. “आमचा उद्देश तणाव निर्माण करणे नसून न्याय मिळवणे हा आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पुढे येत आहे. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवत न्यायाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *