ठळक बातम्या

रंगला खेळ दहा पैठण्यांचा

रंगला खेळ दहा पैठण्यांचा

सफाळे (दि.०१ फेब्रु.२०२६) पालघर जिल्ल्यातील सफाळे पश्चिमेतील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्टच्या इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘विज्ञान प्रदर्शन’, ‘खाद्य पदार्थ जत्रा’ आणि ‘खेळ पैठणीचा’ असे तीन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. * सकाळी २८ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री चिंतामण ठाकूर सर ह्यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. विविध विज्ञान प्रयोग,ऐतिहासिक किल्ले, पृथ्वी सवर्धण, प्रदुषण दुष्परिणाम, घरांचे विविध प्रकार, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला नमुने प्रदर्शनात सादर करण्यात आले.

त्यानंतर लगेच खाद्य पदार्थ जत्रेचे उद्‌घाटन संस्थेचे संचालक श्री. भरत चौधरी सर हयांच्या हस्ते करण्यात आले. खाद्य जत्रेत विद‌यार्थ्यांनी वेगवेगळे प्रदार्थ विक्रीसाठी घरून बनवून आणले होते. पदार्थ विकत घेताना ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून विद्यार्थ्यांंना समाधान वाटले. खाद्य जत्रा आयोजित करण्याचा उद्‌देश्य विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे व गणिती आकडेमोड यावी हाच होता.
दुपारी ठीक ४ वाजता ‘खेळ पैठणीच्या’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम खास पालकासाठी आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.सौ. नियुक्ती शुभम पाटील ह्या होत्या व निवेदिका सौ. लतिका पंकज पाटील मॅडम यांनी खेळ पैठणीसाठी वेगवेगळे खेळ घेतल्यामुळे १० विजयी स्पर्धक पैठणीपात्र ठरले. हे ‘खेळ पैठणीचा’ मुख्य उद्देश महिला पालकांना दैनंदिन जबाबदारीतून विरंगुळा देणे आणि महिला सक्षमीकरणाचा आनंद साजरा करणे हाच होता. पान महिला पालक पैठणीसाठी खेळ खेळत असताना खूप आनंदाने खेळत होत्या. आणि पैठणी निकले-ल्या महिलांचा आनंद गगणात मावत नव्हता.
हया कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजयी महिलांना पैठणी बक्षिस देण्यात आल्या. अध्यक्ष श्री.पी.टी.पाटील सर हयांनी महिलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुपाली भोईर मॅडम आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी कार्यक्रम पार पाडण्यास हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *