ठळक बातम्या

महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदारांना याद्वारे पुन्हा एकदा खुलासा करण्यात येतो

महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदारांना याद्वारे पुन्हा एकदा खुलासा करण्यात येतो

महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदारांना याद्वारे पुन्हा एकदा खुलासा करण्यात येतो की काल दिनांक 2 मार्च 26 रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूकदारांच्या अडीअडचणी व ई चलन संदर्भात जी बैठक झाली ती अत्यंत बारकावे लक्षात घेऊन व प्रत्यक्षात वाहनचालकांच्या म्हणजे ड्रायव्हरचे जे हाल कायद्याचा धाक दाखवून वाहतूक पोलिसांचे कर्मचारी व त्यांचे वार्डन करतात याबाबत मंत्रिमहोदयांना संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ ऑडिओ व पुरावे दिले व ते पाहून मंत्री महोदय सुद्धा संतप्त झाले व त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे व मानवतेचे काही दाखले दिले व वाहन चालकांना अशाप्रकारे वेठीस धरून त्यांचे मानसिक शारीरिक व आर्थिक हाल होऊ नयेत या संदर्भात स्पष्ट सूचना व आदेश दिले मंत्री महोदयांची तळमळ व वाहनचालकांविषयी असलेली आत्महत्या पाहून वरिष्ठ अधिकारी सुद्धा निशब्द झाले.

मंत्री महोदयांनी काल रोजी व तसेच परिवहन विभागाचे अपर सचिव श्री निकम साहेब परिवहन आयुक्त आयुक्त श्री नार्वेकर साहेब व तसेच महामार्ग पोलीस अतिरिक्त महासंचालक यांनी याबाबत ताबडतोब आदेश देऊन महामार्ग पोलिसांच्या पोलीस अधीक्षकांना याबाबत आदेश केलेले आहेत तसेच आंदोलन करते श्री उदय बर्गे यांच्या ज्या पाच मागण्या होत्या त्यातील सर्व मागण्यांबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बल यांनी कायदेशीर कागदपत्रांसहित व वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयांची अंमलबजावणी ताबडतोब घ्यावी व गाडीमालकांचे हित शासन दरबारी कसे जोपासले जावे याबाबत सुचवले त्यावर मंत्री महोदयांनी येत्या सहा तारखेपर्यंत सर्व प्रलंबित मागण्यांबाबत जीआर म्हणजेच शासन निर्णय प्रकाशित केला जाईल या शासन निर्णयावर ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही व्हायला हवी ते सहा तारखेपर्यंत रजेवर असल्यामुळे तो शासन निर्णय सहा तारखेला सही होऊन सर्व नागरिकांसाठी व वाहन चालक व मालकांसाठी प्रकाशित केला जाईल असे सगळे असताना वस्तुस्थिती सत्य असताना व मंत्रिमहोदयांनी वाहनचालकांप्रती आत्मीयता व जिव्हाळा दाखवलेला असताना याचा पोटसूळ उठून काही तथाकथित वाहन चालक व मालकांचे प्रतिनिधी सभागृहाबाहेर मुद्दामहून तमाशा करीत होते बैठकीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाहेर असलेल्या या तथाकथित नेत्यांना आत मध्ये येण्याची व बैठकीतील इतिवृत्तांत ऐकण्याची व आपलेही म्हणणे सादर करण्याची या तथाकथित नेत्यांना लोकशाही प्रणालीतील पद्धतीप्रमाणे विनंती केली.

परंतु स्वतःची पोळी भाजण्यासाठी व मोटार मालकांमध्ये आम्ही कसे श्रेष्ठ आहोत याची चढाओढ या नेत्यांमध्ये आपसात पाहायला मिळाली वास्तविक पाहता यांनी ज्या संघटनेची नाव दिली होती ती नाव शासकीय स्तरावर व शासनाच्या पटलावर कोठेही नोंदणीकृत रजिस्टर नाहीत असे असताना सुद्धा मंत्री महोदयांनी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना यांची बाजू मांडण्यास संधी दिली परंतु वैयक्तिक इरशेपोटी व नेतागिरीच्या इरशेपोटी मीच कसा मोठा असे भासवण्याचा वयोवृद्ध नेत्यांनी केविलवाणा प्रयत्न केला व स्वतःचे हासे करून घेतले आता हाती काही येत नाही असे लक्षात आल्यावर चोराच्या उलट्या बोंबा या मराठीतील म्हणी प्रमाणे संबंधित वयोवृद्ध नेत्याने शासनाच्या नावाने होळीच्या पवित्र दिवशी बोंबा मारण्याची काम अव्यहात पणे केलेले आहे अशा नेत्यांपासून वाहतूकदार संघटनांनी वाहतूकदारांनी चालक मालकांनी सावध राहावे व येणाऱ्या दिवसात इ चलन संदर्भात व आंदोलन करते बगै यांनी शासनाकडे केलेल्या मागण्यासंदर्भात नक्कीच योग्य तो निर्णय येईल अशी याद्वारे महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टॅंकर बस वाहतूक महासंघातर्फे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *