पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.
तारीख : १७ ऑगस्ट २०२५
📍 ठिकाण : पालघर कचेरी रोड
१२ ऑगस्ट २०१५ च्या रात्री साधारण १ वाजता पालघर नगरपरिषदेकडून कचेरी रोडवरील खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं. रेडी मिक्स काँक्रीट टाकल्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून सरळ नगरपरिषदेत दाखल करण्यात आले, जेणेकरून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल पास करता येईल.
पण खरी परिस्थिती अशी आहे की, हा रस्ता फक्त ३ दिवसांतच (१५ ऑगस्ट २०१५) पुन्हा खड्डेमय झाला. म्हणजे ७२ ताससुद्धा टिकला नाही. काँक्रीटचा काहीही ठसा नाही, उलट झाडाच्या फांद्या टाकून ठेवल्या गेल्या होत्या ज्या अपघाताला कारणीभूत ठरू शकल्या असत्या.
👉 असा ठेकेदार जो फोटो-व्हिडिओ दाखवून बिल पास करतो, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.
👉 अशा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणं आवश्यक आहे.
👉 पालघर नगरपरिषदचे इंजिनिअर नागरिकांच्या पैशातून पगार घेत आहेत, पण काम मात्र फसवे करीत आहेत.
पालघर नागरिक संघटनांनी हा प्रकार उच्च स्तरावर नेऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दहीहंडी पार पडली, पुढे गणपतीसारखा मोठा सण येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुर्दशा ही जनतेसाठी मोठा प्रश्न आहे. तत्काळ दर्जेदार रस्त्यांची दुरुस्ती करणे ही नगरपरिषदेसमोरची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
📢 पालघर नागरिकांचा ठाम सवाल :
✅ अजून किती दिवस फसवे काम आणि भ्रष्टाचार सहन करायचा?
✅ जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हा दाखल कधी होणार?
✅ पालघरकरांचा विश्वास परत कधी मिळणार



