बोईसर-चिल्हार रस्ता बनला जीवघेणा! अधिकारी पेट्रोल पंप समोर रिक्षा पलटी होता होता वाचली – पेशंट व लहान मुलांचा थरार

ब्रेकिंग न्यूज
पत्रकार/प्रतिक मयेकर

बोईसर-चिल्हार रस्ता बनला जीवघेणा! अधिकारी पेट्रोल पंप समोर रिक्षा पलटी होता होता वाचली – पेशंट व लहान मुलांचा थरार

बोईसर प्रतिनिधी :
बोईसर-चिल्हार मार्गावरील अधिकारी पेट्रोल पंप समोरचा रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला. पावसामुळे खड्ड्यांनी रस्त्याचे स्वरूप धोकादायक झाले असून याच खड्ड्यात आज एक रिक्षा पलटी होता होता थोडक्यात बचावली. या रिक्षामध्ये एक पेशंट तसेच लहान लहान मुले बसलेली होती. क्षणभर जरी वाहनाचे संतुलन बिघडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेने नागरिकांच्या मनात संतापाचा भडका उडाला आहे.

पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रिक्षा, दुचाकी, रुग्णवाहिका, शालेय बस अशा प्रत्येक वाहनाला या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. बोईसर-चिल्हार मार्ग हा दररोज हजारो नागरिकांचा प्रवासमार्ग असून एवढ्या गर्दीच्या रस्त्यावर अशा प्रकारे खड्डे पडणे म्हणजे थेट अपघातांना आमंत्रणच आहे.

प्रशासन झोपेत की मुद्दाम डोळेझाक करत आहे?
गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्याबाबत नागरिक तक्रारी करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहानमोठे अपघात झाले असून आजची घटना ही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ठळक शिक्का मोर्तब करते.

सविस्तर वृत्त लवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *