पालघर तालुक्यातील कासा चिंचपाडा परिसरात भयंकर एक्सीडेंट…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील एकाच कुटुंबातील 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! एकाच कुटुंबातील 16 जणांसोबत घडलं सर्वात भयंकर
पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील एकाच कुटुंबातील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला आहे. गुजरातमधील एक कुटुंब आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली.
या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील एकाच कुटुंबातील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.



