मनोर ला तालुका घोषित करा….संतोष जनाठे
मनोर व परिसरातील 100 ते 120 गावांचा मनोर तालुका घोषित करावा अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस संतोष जनाठे यांनी लेखी पत्र देऊन केली आहे.

अनेक वर्षाची मागणी व प्रस्ताव, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 2.30 तासाचा लागणार वेळ, मुख्य बाजारपेठ व रोजगाराचे केंद्र अशी विविध कारणे देत संतोष जनाठे यांनी ही मागणी केली असून मनोर व परिसरातील नागरिक या मागणीचे स्वागत करत असून. लवकरच मनोर ला तालुका घोषित करावे या विषयाला धरून स्थानिक नागरिकांमधे आग्रह वाढताना दिसत आहे.



