जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर पोलीस दलाचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम; ३०० वृक्षांचे वृक्षारोपण
पालघर | जावेद लुलानिया.
आज दिनांक ०५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात तब्बल ३०० वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उपअधीक्षक (गृह), पालघर, तसेच पालघर पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा प्रभावी उपाय असल्याचा संदेशही उपस्थितांना देण्यात आला.
पालघर पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवत राबविलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत पालघर पोलीस दलाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला.
#जागतिक_पर्यावरण_दिन.
न्यूज के आधार पर एक अच्छी इमेज बना कर दे



