पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा टोलनाका येथे वाहनचालक व स्थानिक नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात इन्फिनिटी आय केअर सेंटर, पालघर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. भक्ती गाडे, डॉ. सुष्मिता पाटील आणि डॉ. कल्पेश भोईर यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये एकूण ५७७ वाहनचालक व नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे आढळले त्यांना योग्य नंबरचे चष्मे मोफत देण्यात आले. काही वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्याचे निदर्शनास आल्याने अशा वाहनांना मोफत रिफ्लेक्टरही बसविण्यात आले.

वाहतूक सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केले. जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर व त्यांच्या पथकाने या शिबिराचे यशस्वी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *